गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव या ठिकाणी शनिवार २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन मुख्याध्यापक सतीश तंवर,उपप्राचार्य हनुमंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.मराठी भाषा दिनानिमित्त मानसी भालेराव,शिवांजली भोर,समीक्षा वाघ यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचे वाचन केले. शिक्षक मनोगतात श्री.भुजबळ मॅडम यांनी मराठी भाषेतील साहित्य,संत साहित्य, इतिहास यांची माहिती दिली.तसेच पर्यवेक्षिका मानसी भालेराव यांनी मराठी भाषेचे सामर्थ्य सांगणाऱ्या कवितांचे वाचन केले. पर्यवेक्षक संजय वलटे यांनी दैनंदिन जीवनात आपल्या मातृभाषेचा वापर करणे,भाषेला जपणे,वाढवणे या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. उपमुख्याध्यापिका वाळिंबे मॅडम यांनी मराठी भाषेचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तनुजा सपकाळ हिने तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जरे मॅडम यांनी तर आभार ज्योती वाबळे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी विद्यामंदिराच्या उपमुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे, पर्यवेक्षिका मानसी भालेराव, पर्यवेक्षक संजय वलटे, विज्ञान विभाग प्रमुख नितीन पोखरकर,वाणिज्य विभाग प्रमुख अरुण हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.