आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी युवक आणि आधुनिक जीवन याविषयावर डॉ.अशोक बंगाळ यांनी आपले मौलिक विचार मांडले.
यावेळी डॉ.बंगाळ म्हणाले की,
आज कालच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरातील एकोपा नाहीसा झालेला आहे. याला कारण आहे आधुनिक जीवन पद्धती..! एकत्र कुटुंब सुखदुःखात एकत्र असायचं मात्र एकलकोंडी वृत्ती व आधुनिक माध्यमे यामुळे संस्कृती लोप पावत आहे. आधुनिकतेच्या मृगजळापुढे नैसर्गिक आरोग्य पद्धती तरुणाई गमावत आहे.त्याचबरोबर तरुणांनी आपलं ध्येय निश्चित करून आयुष्यात वाटचाल करावी.तसेच वाढत्या वयाबरोबरच मुलामुलींच्या मानसिक व शारीरिक बदलांची जाणीव देखील डॉ. बंगाळ यांनी श्रोत्यांना करून दिली.
यावेळी गुरुवर्य रा.प. सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे,पर्यवेक्षक संजय वलटे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष देशपांडे,प्रा.पोखरकर सर,प्रा.आशिष गांजवे,आनंद वाव्हळ,सरपंच वळती,तेजस भोर,उपसरपंच वळती,प्रकाश लोंढे,पोलीस पाटील वळती,रवींद्र भोर,अध्यक्ष तंटामुक्ती समिती,चैतन्य भोर व समस्थ ग्रामस्थ वळती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंतरा दळे यांनी तर प्रास्ताविक प्रा.संतोष देशपांडे यांनी तर आभार श्रावणी गायकवाड यांनी मानले

Leave a Comment