ग्रामोन्नती मंडळाचे,गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी वळती येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यात आनंद वाव्हळ,सरपंच वळती,तेजस भोर,उपसरपंच वळती, कृषिभूषण धोंडिभाऊ भोर,मनोहर शेळके,गणपत लोंढे, बाळासाहेब लोखंडे ,भिवसेन लोखंडे सर,महेश भोर व वळती ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी ग्रामपंचायत तसेच वळती गावातील विविध परिसरातील कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले.
या उपक्रमामध्ये गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे
राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक सहभागी झाले
कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य हनुमंत काळे व पर्यवेक्षक संजय वलटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष देशपांडे,प्रा.ज्योती वाबळे, प्रा.जयश्री कोल्हे ,प्रा.आशिष गांजवे,प्रा.आकाश गावडे यांनी केले.