ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव आयोजित युवकांचा ध्यास ग्राम -विकास या संकल्पनेखाली आदर्श ग्राम वळती तालुका आंबेगाव याठिकाणी विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी देवदत्त निकम म्हणाले की,
आदर्श ग्राम वळती हे गाव पंचक्रोशीत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे आदर्शवत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव, त्यातच गावच्या व तरुणांच्या विकासासाठी आयोजित विशेष हिवाळी शिबिर नक्कीच मार्गदर्शक ठरतील.याचबरोबर मुलांनी गावातील थापलिंग मंदिर,भीमाशंकर कारखान्याला ही भेट द्यावी.
यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर म्हणाली की,
आदर्श गाव वळती चे सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थ उच्चशिक्षित असल्यामुळे गावचा विकास झपाट्याने झाला आहे,शेती मध्ये आधुनिकता यावी यासाठी नारायणगाव या ठिकाणी कृषी विकास केंद्र आहे याचा देखील लाभ वळती गावच्या शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केले तसेच आदर्शवत गाव वळती येथे कॅम्प आयोजित करण्याची संधी विद्या मंदिराला दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मेहेर यांनी आभार मानले.
मुलांनी सर्वगुणसंपन्न असावे तसेच मुलांना सर्व प्रकारचे सहकार्य ग्रामस्थ करतील असे आश्वासन बाळासाहेब बोऱ्हाडे,संचालक खरेदी-विक्री संघ आंबेगाव तालुका यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी कृषीभूषण धोंडीभाऊ भोर, सचिन टाव्हरे, आनंद वाव्हळ,सरपंच वळती,तेजस भोर,उपसरपंच,वळती यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाऊ भिका भोर,रवी भोर, महेंद्र भोर, प्रकाश लोंढे पाटील,प्रकाश पाटे,अध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ,मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक,उपमुख्याध्यापक सतीश तंवर,उपप्राचार्य हनुमंत काळे,हिंगे सर, पोखरकर सर, बोरसे सर, टेंभेकर सर, कुंभार सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशपांडे कार्यकारी अधिकारी एन.एस.एस यांनी तर पर्यवेक्षक संजय वलटे,विनायक लोंढे यांनी सूत्रसंचालन केले तसेच उपप्राचार्य हनुमंत काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
How to improve knowledge skills
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip ex ea commodo consequat. Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia.
The positive power of education