सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मानवतेचे प्रणेते अध्यात्मिक गुरु व शांततेचे दूत श्री.श्री.रविशंकर यांच्या शुभहस्ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना तर शैक्षणिक व कृषी क्षेत्रात प्रदीर्घ योगदानाबद्दल व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवन साधना गौरव पुरस्कार नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल घमाजी मेहेर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पद्मभूषण राम नाईक,पद्मश्री ॲड.उज्वल निकम,पद्मश्री मिलिंद कांबळे,मा.सतिशराव काकडे देशमुख,मा.कृष्णकुमार गोयल,मा.हेमंत धात्रक,प्राचार्य ठकाजी कानवडे यांना देखील जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
“यावेळी कृषिरत्न अनिल तात्या मेहेर म्हणाले कि,सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेण्याचे भाग्य मला लाभले,विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त मला सन्मानित केल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने ग्रामोन्नती मंडळाच्या माध्यमातून समर्पित जीवन जगण्यासाठी मी कटीबद्ध राहील.”
या कार्यक्रम प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे तसेच सौ.मोनिका मेहेर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक ऋषिकेश मेहेर,गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.हनुमंत काळे,विद्यामंदिराचे उपमुख्याध्यापक श्री.सतीश तंवर, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.गणपत होले, पर्यवेक्षक संजय वलटे,माजी प्राचार्य डॉ.कैलास बहुले,डॉ.श्रीकांत शेवाळे,प्रा.मिलिंद कसबे,प्रा.श्रीकांत फुलसुंदर,प्रा.लहू गायकवाड,तसेच ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी व सर्व प्राध्यापक,शिक्षक वृंद उपस्थित होते.