विद्यार्थिनींच्या प्रामाणिकपणामुळे अंगठी परत

नारायणगावमधील रा. प. सबनीस महाविद्यालयातील शिक्षक, संस्थेकडून कौतुक

गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींचा प्रामाणिकपणा समोर आला आहे.प्राजक्ता रामदास अभंग व श्रुतिका संतोष खांडगे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील ह्या विद्यार्थिनींना शालेय परिसरात सोन्याची अंगठी सापडली त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे यांच्याकडे ती परत करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

महाविद्यालयाच्या माजी शिक्षिका सुनिता लंभाते ह्या शालेय परिसरात संध्याकाळी शतपावली करत असताना त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी हरवली. शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे सर्व विद्यार्थी सकाळी महाविद्यालयात येत होते त्याच दरम्यान प्राजक्ता अभंग व श्रुतिका खांडगे या विद्यार्थिनी महाविद्यालयात येत होत्या दरम्यान खाली पडलेली सोन्याची अंगठी पाहताच ती प्रामाणिकपणे कार्यालयात जमा केल्यामुळे विद्यार्थिनींच कौतुक होत आहे. विद्यार्थिनींच्या या प्रामाणिकपणाबद्दल उपप्राचार्य हनुमंत काळे यांच्या हस्ते त्यांचा पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक संजय वलटे,विज्ञान विभागप्रमुख नितीन पोखरकर,सुनिता लांभाते उपस्थित होत्या. संबंधित घटना विद्यार्थ्यांमध्ये असलेला प्रामाणिकपणा व स्वाभिमानी वृत्ती दाखवते असे मत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर यांनी व्यक्त केले.अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे,विश्वस्त प्रकाश पाटे,मोनिका मेहेर यांनी घडलेल्या घटनेचे तोंड भरून कौतुक केले.