आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून गावातील सर्व परिसरात स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. पाच दिवस विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश श्रमदानातून तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी घडावा हाच असतो, या हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून गावचा केलेला कायापालट व आपल्या वर्तणुकीतून ग्रामस्थांना प्रभावित केले, याचमुळे या कार्यक्रमाची सांगता होत असताना विद्यार्थी ग्रामस्थ व शिक्षक वृंद यांना अश्रू अनावर झाले.याच शिबिराचा समारोप वळती गावात वृक्षारोपण करून करण्यात आला, यावेळी वळती गावचे सरपंच आनंद वाव्हळ,उपसरपंच तेजस भोर,ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित खैरे,कार्यवाह रवींद्र पारगावकर,संचालक डॉ.संदीप डोळे, उपमुख्याध्यापक सतीश तंवर,गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे,पर्यवेक्षक संजय वलटे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष देशपांडे,प्रा.विवेक बोरसे व सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते.