गुरुवर्य

सकाळची प्रसन्न पवित्र वेळ, रामप्रहर मागे सरत होती, लाल किरमिजी रंगांची उधळण करीत काळ्या पांढऱ्या ढगांआडून सूर्यनारायण डोकावू लागला होता, निळ्या आसमंतातील अभ्रांना चंदेरी सोनेरी सूर्यप्रभा उजळत होती.त्या भरजरी सोनेरी किरणांनी पर्वती ची शोभा खुलत होती, दूरवर सिंहगडाची क्षितिजे जणू शिवशौर्यगाथा गात होती, तळजाई आणि […]