आदर्श ग्राम वळती,आंबेगाव याठिकाणी ग्रामोन्नती मंडळाचे, गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव यांमार्फत राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी युवकांना मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी तरुणांपुढील आव्हाने याविषयावर प्रा.स्वप्नील कांबळे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कांबळे म्हणाले कि, देशाचं भवितव्य सोळा ते एकोणीस वयोगटाच्या हातात आहे, आजची तरुणाई उद्याच भविष्य आहे. यासाठी ह्या संवेदनशील काळात तरुणाईला चांगली संगत महत्वाची आहे. शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करावाच मात्र तरुणांनी ग्रामीण राजकारनात देखील आपलं नशीब अजमावावं आणि यासाठी ध्येयनिश्चित असणं गरजेज आहे तरच भरकटलेली तरुणाई आत्मकेंद्री होऊन यशाकडे वाटचाल करेल.
यावेळी वळती गावचे सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर,बाळासाहेब भोर,मनोहर शेळके, महेश भोर,गुरुवर्य रा.प.सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे,पर्यवेक्षक संजय वलटे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष देशपांडे,प्रा.आशिष गांजवे,प्रा.चैताली आवटे,प्रा.मनीषा देशमुख, प्रा.आकाश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.