राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत युवकांचा ध्यास -ग्राम विकास या संकल्पेनेतून विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन आदर्श ग्राम वळती, आंबेगाव याठिकाणी करण्यात आले आहे. याप्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.यानिमित्ताने प्रमुख व्याख्याते प्रा.रतिलाल बाबेल म्हणाले कि,
प्रत्येक विदयार्थ्याने शिक्षणासमवेत अध्यात्म व विज्ञानाची कास धरावी. वरिष्ठांविषयी आदरभाव व कनिष्ठांच्या प्रती करूणाभाव,वेदना जाणणे म्हणजे अध्यात्म,विवेकाने वागणे म्हणजे अध्यात्म,नित्यकर्म पारदर्शकपणे करणे म्हणजे अध्यात्म…!
विद्यार्थी दशेत मन चंचल असते,मर्यादेत राहुन सकारात्मक विचार शैली ठेवली तर जीवनात विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात फक्त त्याला जोड अध्यात्माची असायला हवी आणि हे अध्यात्म आपल्याला संतांच्या वाणीतून कळू शकते.जे जीवनात फुलवितात वसंत ते संत..!
अशा मौलिक शब्दांत प्रा.रतिलाल बाबेल यांनी संबंधित उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी अर्चना कोल्हे,सहाय्यक गटविकास अधिकारी पं.समिती आंबेगाव,गुरुवर्य रा.प. सबनीस कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हनुमंत काळे,पर्यवेक्षक संजय वलटे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.संतोष देशपांडे,प्रा.पोखरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक लोंढे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी वळती,धोंडिभाऊ भोर,सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भोर,आनंद वाव्हळ,सरपंच वळती,तेजस भोर,उपसरपंच वळती,महेश भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी भोर,वैष्णवी चिलप यांनी तर प्रास्ताविक प्रा.संतोष देशपांडे यांनी तर आभार आर्पिता उंबरे यांनी मानले.

Leave a Comment